सारथी महाराष्ट्राचा.. उदगीर तालुका प्रतीनिधी
उदगीर नगर परिषदे मध्ये प्रशासकाकडून सामान्य जमतेची आर्थिक लूट.
साधारण 2 वर्ष झाली, उदगीर,नगर परिषदेची सर्व सुत्र प्रशासकाकड़े आहेत, नगर परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर प्रशासकांनी उदगीर शहर हद्दीतील,वेगवेगळे करामध्ये (tax ) अवाजवी वाढ केली आहे. आमच्या प्रतीनिधी नी या बाबत नगर परीषदेच्या अनेक अधिकाऱ्याशी संपर्क करुण या बद्द्ल माहिती विचारली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे ती आशी की, उदगीर शहरातील नागरिकांना जास्तीचा ज्यादा कर (tax ) विनाकारण भरावा लागत आहे. जीवन अवश्यक गरजेपैकी एक गरज पाणी पूरवठा ही असताना सुद्धा. उदगीर नगरपरिषदेच्या जाजक करप्रणाली मुळे. नागरिक त्रस्त आहेत. एक तर चार दिवसातून एकदा नळाला पाणी सोडले जाते आणि नागरिकाच्या खिशातुन नळपट्टी मात्र वार्षीक 3000 एवढी उकळली जाते. राज्यभरातील इतर पाणीकरापेक्षा 3 पटीने जास्त कर उदगीर नगर परिषद अकारत आहे.
या विषयावर नागरिकांशी बोलले असता, नागरिक अत्यंत संत्तप्त असल्याचे चित्र उदगीर मधे आहे. अनेक राजकीय पक्ष, संघटना या जाजच करवाढ़ीच्या विरोधात आंदोलन, करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रानी दिली आहे.
उदगीर नगरपालिकेच्या पाणीपट्टीचा वरील तक्त्यानुसार , ईतर नगरपालिकांच्या दरांशी तौलनिक विवरण.


Discussion about this post