
Dattatray Gade Arrested : दत्तात्रय गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम! पोलिसांना वाटलं तोच सापडला; पुढच्या 15 मिनीटात दुर झाला गोंधळ, म्हणाला, ‘अहो साहेब मी तो नव्हेच…’Dattatray Gade Arrested : पोलिसांचे पथक तातडीने आरोपीच्या शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी पोहोचलं होतं, त्यावेळी पोलिसांकडे आरोपीचा फोटो होता. आरोपीसारखा दिसणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
AdvertisementBy :अंकिता खाणेUpdated at : Fri, February 28,2025, 1:19 pm (IST)pune swargate assault Dattatraya Gade and brothers look same-to-same The police thought they had found him In the next 15 minutes the confusion Dattatray Gade Arrested : दत्तात्रय गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम! पोलिसांना वाटलं तोच सापडला; पुढच्या 15 मिनीटात दुर झाला गोंधळ, म्हणाला, ‘अहो साहेब मी तो नव्हेच…’Dattatray Gade ArrestedSource : ANI Video Player is loading.Close PlayerUnibots.comPune Swargate Assault Case :
पुण्यातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणार्या दत्तात्रय रामदास गाडे याला काल (शुक्रवारी) रात्री अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. शिरूरमधील गुणाट या मुळगावी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची आणि डॉग स्कॉडची मदत घेतली होती. दरम्यान ज्या शेतामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं, तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही. पण रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जेव्हा तो तहान भूक लागल्यानंतर नातेवाईकांच्या घरी गेला, तेव्हा आरोपी गावातच असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर एका बेबी कॅनॉलमध्ये झोपलेल्या अवस्थेत दत्ता गाडे सापडला. पण त्याआधी पोलिसांकडून दत्ता गाडे समजून दुसऱ्याच गाडेला उचललं होतं, त्याच कारण म्हणजे दत्ता गाडे आणि त्याचा भाऊ हे दोघे सेमच दिसतात.Continues below advertisementदत्ता गाडे अन् भाऊ म्हणजे ‘राम आणि श्याम’घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर आरोपीची ओळख झाली. आरोपीचा फोटो घेऊन पोलिसांचे पथक तातडीने आरोपीच्या शिरूर तालुक्यातील गुनाट या मुळगावी पोहोचलं. पोलिसांकडे आरोपीचा फोटो होता. त्या फोटोतील आरोपीसारखा दिसणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दत्ता गाडे सापडला असं पोलिसांना वाटलं होतं. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. पण आपण ज्याला शोधत आहे, तो दत्ता गाडे पकडलेला आरोपी नाही असं सांगितल्यानंतर पोलिसांनी डोळ्यावर आणि कानांवर विश्वास बसला नाही.पहिल्यांदा ताब्यात घेतलेला आरोपी हा दत्ता गाडे नसून त्याच्यासारखा हुबेहुब दिसणारा त्याचाच भाऊ असल्याचे 15 ते 20 मिनिटांनी स्पष्ट झालं होतं.
आरोपीच्या घरावर धाड टाकली. तेव्हा घरामध्ये त्याचा भाऊ होता. तो दिसायला अगदी आरोपी दत्ता गाडे सारखा असल्याने पोलीसही चक्रावून गेले होते. तो मी नव्हेच असं दत्ता गाडेचा भाऊ सांगत होता. माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो, तुम्ही दत्ता गाडेला शोधताय ना? असा प्रश्न दत्ता गाडेच्या भावाने केला. त्यानंतर पोलिसांनी दत्ता गाडेच्या भावाला सोडून दिलं. त्याची चौकशी देखील करण्यात आली.Continues below advertisement
रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी प्यायला आल्यानंतर, मला पश्चाताप होत आहे. मला सरेंडर व्हायचं आहे, असे तो बोलला. गेल्या दोन दिवसांपासून तो उसाच्या शेतात अन्न पाण्याशिवाय लपून बसून होता. आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचे पथक पहाटे पुण्यात दाखल झाले आहे. दरम्यान, आरोपी दत्ता गाडे याची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. रात्री 2 वाजता त्याला पुण्यात आणलं. 3 वाजता त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज त्याला कोर्टात हजर करणार येणार आहे. दत्तात्रय गाडे आणि त्याचा भाऊ सारखे दिसतात. गाडेच्या मोबाइलवरून त्याच्याशी सातत्याने संपर्कात असलेल्या काही जणांची चौकशीही करण्यात आली, अशी माहिती देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. Published at : Fri, February 28,2025, 1:19 pm (IST)Tags :Pune PolicePolicePune CrimeCrime NewsDattatray GadeDattatray Gade
Discussion about this post