सोयगाव प्रतिनिधी:- भरत पगारे
येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्यावतीने गुरूवारी (दी.२७) रसायन व जैव-रसायनशास्त्रातील सद्यकालीन संशोधनात्मक विकास’ याविषयावर राष्ट्रीय परिषद घेण्यात आली.रसायन व जैव-रसायनशास्त्रातील सद्यकालीन संशोधनात्मक विकास’ याविषयावर विविध वक्त्यांनी मांडली मते मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक प्रोफेसर डॉ. एम. के. लांडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आयआयटी जोधपूर येथील शास्त्रज्ञ व सहयोगी प्रध्यापक डॉ.रोहन एरंडे व डॉ. बी. एम. कृष्णा मरीसेरला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक व शास्त्रज्ञ डॉ. भास्कर साठे, डॉ बी. के मगर, डॉ. अजय पाटील यांनी परिषदेच्या अनुषंगाने सहभागी संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.

या परिषदेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, रसायनशास्त्राचे विभागप्रमुख व संयोजक डॉ. रामेश्वर मगर, डॉ. सुनील चौधरे, डॉ. संतोष पडघन, डॉ. मनोजकुमार चोपडे, डॉ. पंकज गावित, प्रा. शाम टकले, कनिष्ठ विभागप्रमुख डॉ. उल्हास पाटील, अधिक्षक श्री. पंकज साबळे यांच्यासह महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ : – सोयगाव : संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेत संशोधकांच्या पोस्टारचे उद्घाटन करताना शास्त्रज्ञ व प्राध्यापक डॉ भास्कर साठे यांच्या समवेत प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे व संयोजक डॉ रामेश्वर मगर व इतर मान्यवर
Discussion about this post