15 Total Views , 1 views today
प्रतिनिधी निलेश सुर्वे हिंगोली
जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरा गायकवाड येथील शेतकरी सुधीर शेळके हे 25 फेब्रुवारी दुपारी एकच्या सुमारास आपल्या शेतात गेले असता तुतीच्या झाडामध्ये बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर प्राण घातक हल्ला चढविला कसाबसा फळ काढत त्यांनी आपला जीव वाचवला.. त्यांना तात्काळ वाशिम येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.. सदरील शेतकऱ्याला रानडुकराने धडक देऊन खाली जमिनीवर पडले व मांडीला गंभीर दुखापत केली त्यांनी कशीबशी आपली सुटका करून दूर पळ काढला जखम मोठी असल्यामुळे त्यांचा खूप रक्तस्त्राव झाला. मांडीच्या जखमीला 25 टक्के पडले असून उपचार चालू आहेत. वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे




Discussion about this post