मिरज बस स्थानकावर आज शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘राडा’ झाला. निमित्त होते ‘लाडकी बहीण योजनेचे’. कोल्हापूर मध्ये झालेल्या लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मिरज बस आगारातून वीस बसेस सोडल्याने मिरजेतील प्रवाशांची गैरसोय झाल्याचा दावा ठाकरे गटाने करत बसेस वर लावलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्स ना काळे फासले.
हा घटना समजताच शिंदे गटाचे पदाधिकारी तात्काळ तिथे पोहोचले आणि दोन गटांमध्ये बाचाबाची सुरु झाली या हे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी ताब्यात घेतले. मात्र शिंदे गटाचे पदाधिकारी बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याच्या मागणीला घेऊन बसून होते.
मात्र नागरिकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण पसरले पोलिसांनी या दोन्ही गटांमध्ये वेळीच हस्तक्षेप केला नसता कदाचित आणखी वेगळे चित्र याठिकाणी पाहायला मिळाले असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये होती.
Discussion about this post