पाथरी (प्रतीनिधी):– अहमद अन्सारी पाथरी परभणी.
दिनांक 1 मार्च 2025 रोजी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल शाळा माळीवाडा पाथरी येथे जे ई लसीकरण मोहीम व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे उदघाटन माननीय शैलेश लाहोटी उपविभागीय अधिकारी पाथरी यांच्या हस्ते करण्यात आले.
जापानीज एनकेफलाईटीस हा विषाणूजन्य आजार असून प्रामुख्याने डुक्कर कुत्रे असे प्राणी तसेच बदक, बगळे अशा पाण्यात राहणाऱ्या पक्षांमध्ये आढळून येतो. बाधित प्राणी व पक्षांना क्युलेक्स नावाचा डास चावला असता बाधित डास लहान मुलांना चावला असता त्यांना विषाणूमुळे मेंदूज्वर होऊ शकतो हा आजार प्रामुख्याने पंधरा वर्षाखालील मुलांना होतो. या आजारावर कुठलेही औषध उपलब्ध नाही परंतु लसीकरणाद्वारे प्रभावीपणे प्रतिबंधन करता येते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे एक ते पंधरा वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण मार्च महिन्यात करण्यात येणार आहे.

सदरील लसीकरण हे पाथरी तालुक्यातील सर्व शाळा व अंगणवाडी मध्ये घेण्यात येणार आहे. सदरील लसीकरण मोहिमेचा एक ते पंधरा वर्षाच्या बालकांचा लाभ घेण्याचे आवाहन शैलेश लाहोटी उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी केले. श्री अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल शाळा माळीवाडा येथील लसीकरण उद्घाटनाच्या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निखिल पुजारी, ग्रामीण रुग्णालय पाथरीचे वैद्यकीय अधिक्षक राजेंद्र जाधव, डॉ. रामकिशन ईक्कर डॉ हर्षल देशमुख, डॉ.सारिका कुलकर्णी, डॉ. फिरदोस अंसारी, डॉ. बाळासाहेब सुरवसे, श्री संजय कदम, बाल प्रकल्प अधिकारी गायकवाड मॅडम, गटशिक्षणाधिकारी राठोड सर, तसेच अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल शाळेचे शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऍड. राजेश गिराम, मुख्याध्यापक शिक्षक वृंद व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी.
Discussion about this post