प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांच्याशी बाबाजानी मित्र मंडळ च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन सत्कार केला तसेच शहरातील रमजान च्या पवित्र महिन्या निमित्त मुख्य रस्त्यावरून रहदारीस होणाऱ्या अडथळ्याची समस्या दूर करण्या करीता चर्चा केली. तसेच पाथरी शहरातील मुख्य रस्ता संध्याकाळी पाच ते सात दरम्यान या वेळेत तीन चाकी व चार चाकी वाहनापासून मुक्त करून दुसऱ्या मार्गाने वळविण्याचे नियोजन करण्यात यावे अशी विनंती केली असता पोलीस प्रशासनाकडून पूर्ण सहकार्याचे व रहदारीचे नियोजन करण्याचे आश्वासन देण्यात आले. भेट व चर्चे वेळेस बाबाजानी मित्र मंडळाचे मोहम्मद खुर्शिद शेख, दादाराव गवारे, मुस्तफा अन्सारी, शफी भाई अन्सारी, कमलाकर ढवळे, , इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धन्यवाद माननीय पोलीस निरीक्षक महेश लांडगे व पोलीस प्रशासन पाथरी.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी.
Discussion about this post