सातारा (प्रतिनिधी अनिलकुमार कदम)
सातारा जिल्ह्यातील फलटण माण खटाव कोरेगाव खंडाळा तालुक्यातील गहु, ज्वारी, हरभरा,कांदा,मका, टोमॅटो मिरची कोबी फ्लॉवर वांगी मेथी कोथिंबीर लसूण गवार भेंडी पिकं भाजीपाला पाण्या अभावी सुकू व वाळू लागली आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.उरमोडी,धोम,तारळी,निरा,
धोम बलकवडी या विविध कालव्याचे पाणी आवर्तन सुरू झाले आहे.धोमबलकवडी,धोम , तारळी, निरा, उरमोडी या विविध कॅनाॅलला पुरेसे दाबाने पाणीपुरवठा झाला व तालुक्यातील गावोगावचे तलाव, नालाबल्डींग, धरणे, ओढे नाले, बंधारे पाण्याने पूर्ण भरले तरच पाण्याअभावी धोक्यात आलेली पिकं भाजीपाला शेतकरी यांचे हाताला लागेल अशी परिस्थिती आहे.
माण खटाव कोरेगाव खंडाळा फलटण तालुक्यातील तील पिके वाढत्या तापमानामुळे तरकडून सुकू लागली आहेत.जनावरे,गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.वाडीवस्तीवर जनावरांना चारा टंचाईच्या झळा बसत आहेत.उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे मजूर शेतात काम करताना टाळाटाळ करत आहेत.त्यामुळे शेतातील ज्वारी, हरभरा, गहु,मका काढणी, खुडणी, मळणी, पेंढ्या बांधणे कामे अडचणीत आली आहेत.शेतकरी हा पाण्याचा प्रश्न, मजूरांचा प्रश्न, जनावरांचा चारा, पाणी प्रश्न व खंडीत वीजपुरवठा यामुळे अडचणीत आला आहे.
शेतात भांडवली गुंतवणूक करुन हातातोंडाशी आलेली पिकं भाजीपाला पाण्या अभावी व मजूरा अभावी, वाढत्या तापमानामुळे हातची जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
Discussion about this post