
प्रा. दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा:तालुका प्रतिनिधी
+++++++++++++++
विदर्भात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा विस्तार करून बळकटी देण्याची जबाबदारी आता माजी आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या खांद्यावर
महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागले.आघाडीचे नेते आपलीच सत्ता येणार असे माध्यमां सोबत बोलत होते. निवडणुकींच्या रणधुमाळीत सत्तेत येण्यासाठी आघाडी आणि युती दोघांकडून ही महाराष्ट्रातील जनतेला लोक लुभावन्या घोषणांचा पाऊस महाराष्ट्रात झाला. राज्यभरात मात्र पंतप्रधान मोदींची गॅरंटी, लाडकी बहीण योजनेने विरोधकांचा भ्रमनिरास करत भाजपाला भरघोस यश देत.मा. एकनाथ शिंदे यांची शिवसेना व मा. अजितदादा पवार यांचां राष्ट्रवादी पक्ष यांना भरभरून मतदान करत. दोघांनाही निराश केले नाही. परंतु आकड्यांचा खेळ भाजपच्या बाजूने असल्यामुळे. दोघांनाही उपमुख्यमंत्री पदावर तह करत तलवारी मॅन कराव्या लागल्या . सुरुवातीला मा.एकनाथ शिंदे यांनी रुसवे फुगवे करूनही पाहिले. परंतु मा. अजित दादांनी पक्षाचा व आपला पाठिंबा भाजपा व मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करून.मा. एकनाथ शिंदे यांच्या रुसव्या, फुगव्याची हवाच काढून टाकली. या निवडणुकीत राज्यात अनेक पडझडी झाल्या.अनेकांनी अनेक कारणानीं पक्षांतरे केली. यापैकी बरेच जणांचे अंदाज चुकले. सिदंखेडराजा मतदार संघाचे माजी मंत्री व दोन दशकापेक्षा जास्त आमदार व सतत मंत्रिमंडळात मंत्रीपदाची संधी मिळालेले जिल्ह्यातील आणी विदर्भातील मातब्बर नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी अजित दादा गटाला राम राम करत राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हातात घेतली. मुसलमानांची गठ्ठा मते निवडून येण्यासाठीच हे कारण होतं पण ऐनवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष पद न सोडता. उलट मा.अजित दादा कडून राष्ट्रवादीचे तिकीट विद्यमान आमदार मनोज कायंदे यांच्यासाठी आणून मतदार संघाचे चित्र पालटून टाकले. आता मात्र निवडणुका संपल्या त्यानंतर पक्ष मजबूत करणे पक्ष वाढवणे पक्षाची ताकद निर्माण करणे या बाबी दोन्ही राष्ट्रवादी नेत्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहे. माननीय शरद पवारांनी पुन्हा एकदा नव्याने पक्ष मजबूत करण्यासाठी, वाढवण्यासाठी डॉक्टर राजेंद्र शिंगणेच्या हाती जिल्हाच नाही तर आख्खा विदर्भ सोपवलेला आहे. आता डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सिद्ध करायचे आहे “टायगर अभी जिंदा है”. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनाही येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीत पक्षाची ताकद सिदंखेडराजा मतदारसंघासह जिल्ह्यात दाखवावी लागणार आहे. मतदार संघ सोडला तर जिल्ह्यात इतर ठिकाणी काम करणे सोपे नाही तरीसुद्धा पालकमंत्री योगायोगाने राष्ट्रवादी अजितदादा गटाचे असल्यामुळे फार मोठी संधी त्यांना आहे. आमदार मनोज कायंदे नवीन आहेत परंतु पक्षाकडून जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनाअर्थपूर्ण ताकत द्यावी लागणार आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे अनुभवी नेते असून त्यांनी राज्यात सहकारासह मंत्रिमंडळात अनेक ठिकाणी काम केलेले आहे. सध्या ते विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, सहकार क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्या सह संपूर्ण विदर्भात त्यांचं काम आहे. त्यांचा राजकीय अनुभव, संघटन कौशल्य, कुशल नेतृत्व पक्ष वाढीसाठी विदर्भात कामाला येणार आहे. नवीन पिढी राजकारणात येऊ पाहते, पक्षातील आहे त्याच त्या कार्यकर्त्यांनां जनता कंटाळलेली आहे. पक्षासाठी गाव, जिल्हा आणि विदर्भात नवीन नेतृत्वाची फळी उभी करावी लागेल, भाकरी फिरवावी लागेल काहींना हेतू पुरस्सर हाताला धरून राजकारणात पक्ष संघटनेत काम करण्यासाठी आणावे. लागेल. गावा गावांत त्याच त्या कंटाळलेल्या नेत्यांना बाजूला सारून. अठरा पगड जातीतील नवीन नेतृत्व बाहेर येऊ पाहते त्यांना बाहेर काढाव लागेल.गावा गावांतील त्या त्या जातीतील आपल्या बोटाला धरून थोडे मोठे झालेले नेते. नवीन पिढीतील तरुणांना पुढे येऊ देण्यासाठी अडचण ठरत आहे. कार्यकर्त्यां वरील राग जनतेने माजी आमदार डॉक्टर शिंगणेवरच काढला. लोक आता उघड मत व्यक्त करताना दिसतात. पराभवासाठी चहापेक्षा गरम झालेल्या किटल्याच कारणीभूत ठरल्या.लोक बडव्यांना कंटाळले होते . याचा अर्थ सर्वच कार्यकर्त्यांनां हा नियम लागू होत नाही चांगले कार्यकर्तेही आहेत पक्षात, संघटनेत, त्यांच्यासाठी उलट मानाचं पान वाढून त्यांना न्याय द्यावा लागेल. निवडणुकीत अनेक कार्यकर्ते नसलेले परंतु डॉक्टर शिंगणेवर प्रेम करणारे होते परंतु त्यांचा आवाज दरबारी व होयबामुळे पोहोचला नाही. किंवा पोहोचू दिला नाही. विदर्भात पक्ष मजबुती, बळकटीकरणाची सुरुवात सिंदखेडराजा इथून करावी लागणार आहे . राष्ट्रवादीचे विदर्भातील राजकीय समीकरण बदलण्यासाठी पक्ष नोंदणीसह, पक्षाची ध्येय धोरणे, कार्यकर्ते व नेत्यांचे प्रशिक्षण, पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण संपवणे, कार्यकर्त्यांनां नवसंजीवनीची बुटी द्यावी लागणार आहे. कार्यकर्ते सक्रिय राहण्यासाठी कार्यक्रम द्यावा लागणार आहे. जनतेच्या समस्येसाठी पक्ष ,संघटना, कार्यकर्ते पक्षाची झेंडे घेऊन रस्त्यावर जनतेचा आवाज बनले पाहिजे. आंदोलन आपल्यासाठी आहे ही भावना जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे .माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची विदर्भाच्या पक्ष बळकटीसाठी झालेली निवड अतिशय योग्य अशीच आहे..
Discussion about this post