महाबळेश्वर – सुरेंद्र जाधव
तापोळा येथे msrdc च्या माध्यमातून नवीन महाबळेश्वर प्रारूप विकास आराखडा सुनावणी घेण्यात आली. सदर प्रसिद्ध केलेल्या प्रकल्पसाठी शेतकऱ्यांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या त्या संदर्भात आराखड्यातील सूचना व हरकती विषयी सुनावणी तापोळा येथे पार पडली.
विभागातील शेतकऱ्यांनी अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पमध्ये घेऊ नयेत अशी नियोजन समिती समोर मागणी केली. ग्रामसभा व ग्रामपंचायत मार्फत विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी, बाजार मंडई, स्मशानभूमी, खाजगी वन जमीन, प्रशिक्षण केंद्र, वाहनतळ आदी टाकलेली आरक्षणे रद्द करावीत, प्रकल्पबाबत सविस्तर माहिती, आरक्षित नकाशे मराठी मध्ये लिखित स्वरूपात ग्रामपंचायतीना उपलब्ध करून द्यावेत. पुन्हा सर्वे करून योग्य ती आरक्षणे समाविष्ट करून द्यावीत, प्रकल्प अंमलबजावणी नंतर मिळकतधारकांना
कोणकोणते कर भरावे लागणार, कर भरण्याची प्रक्रिया व लागणाऱ्या परवानग्या बाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
सुनावणीसाठी नियोजन समिती अधिकारी श्रीमती वैदेही रानडे – सहव्यवस्थापक msrdc ,श्रीमती पूर्वा केसकर – पर्यावरणतज्ज्ञ,श्रीमती आशा डहाके, श्री किशोर पाटील व इतर पर्यावरणतज्ज्ञ उपस्थित होते. कोयना सोळशी व कांदाटी सारख्या अतिदुर्गम भागातून खूप मोठ्या प्रमाणात सूचना व हरकती मांडण्यासाठी शेतकरी हजर होते .
यावेळी अनेक मांगण्याची निवेदने उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आली व पुढील सुनावणी 4 मार्च रोजी तापोळा येथे सुरु राहणार आहे.
Discussion about this post