प्रतिनिधी:- धनराज सावंत
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना रास्त वीज पुरवठा द्यावा, पिक विमा व कृषी अवजारांवरील जीएसटी रद्द करावी, सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला व्हावे, देवणी वळू संशोधन केंद्र देवणी ला पूर्ववत व्हावे, शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान तात्काळ मिळावे, सोयाबीन हमीभावातील फरक, सोलार पंप तात्काळ देण्यात यावे, उत्पादन खर्चाच्या आधारे पिकांचे भाव ठरावेत, दूध दरवाढ द्यावी यासारख्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आज महायुती सरकारच्या विरुद्ध लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या व खासदार डॉ. शिवाजी काळगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रदेश सचिव अभय साळुंके, सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, विजय देशमुख, रवी काळे, विद्याताई पाटील शीलाताई पाटील, अनिल चव्हाण, प्रवीण बिरादार, सिराजुद्दीन जहागीरदार, प्रा.एकनाथ पाटील, विपुल हाके,सुभाष घोडके,विजयकुमार पाटील, कल्याण पाटील,मारुती पांडे, दत्तोपंत सूर्यवंशी, अजहर हाश्मी,महेश धूळशेट्टी, विलास पाटील यांच्यासह सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत
Discussion about this post