बारामती येथे पुरस्कार वितरण उत्साहात सोहळा संपन्न…
बारामती : रयत भवन बारामती येथे वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेश आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने केलेल्या २९९ व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती २०२४ आणि गुणगौरव समारंभात यशवंत क्रांती संघटनेचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दगडूबा वजीर यांना राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास शेतकरी नेते मा.खा.राजुशेट्टी साहेब, मा.युगेंद्र दादा पवार, मा.श्री.सतीश मामा खोमणे, मा.योगेश राजे होळकर ( वाफगाव ), श्री.दशरथ राऊत, मा.श्री.शशिकांत तरंगे, श्री.बबनराव आटोळे, श्री.गोविंद देवकाते, श्री.महेंद्र खटके,श्री.प्रकाश घोळवे,मा.नारायन माने (अव्वर सचिव गृह मंत्रालय मुंबई ), मा.रमेश ढवळे ( उद्योगपती मुंबई ) ॲड. गुलाबराव गावडे, मा.पोपटराव गावडे , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संजय वाघमोडे यांनी दुर्गम असणाऱ्या दऱ्याखोऱ्यात वाड्यावस्तीत घनदाट जंगलात आपल्या लेकराबाळास मोठ्या हिमतीने व धाडसाने राहणारी जमात म्हणजेच आपला धनगर समाज होय प्रामुख्याने शेळ्या -मेंढ्यांना आपल्या लेकराप्रमाणे जीव की प्राण समजून त्यांच्यावर प्रेम करणारी ही साधी भोळी माणसे आज आधुनिकरणाच्या या युगात कुठेतरी मागे पडू नये ते या जगाच्या प्रवाहाबरोबर पुढे जावेत हा प्रामाणिक उदांत हेतू ठेवून मी माझ्या समाजाची काही तरी देणं आहे.. या शुद्ध हेतूने सश दगडोबा वजीर यांनी यशवंत क्रांती नावाची संघटना स्थापन केली. लहानपणापासून गरिबीची जाण असल्याने आपल्या समाजाचे नेमके दुखणे काय आहे हे परिस्थितीमुळे लहानपणीच कळाले होते. यातून समाजकार्याची आवड निर्माण झालेने आपल्या समाजासाठी काहीतरी करावे. ही त्यांची धडपड सतत चालू होती त्याचाच भाग म्हणून यशवंत क्रांती संघटनेमार्फत विविध समाजकार्य त्यांच्या हातून घडू लागली. एक वही समाज बांधवांसाठी दऱ्याखोऱ्यात रहाणाऱ्या समाजबांधवा च्या उपक्रमांक, एक पत्रकार म्हणून, समाजाच्या अनेक अडचणी मेंढपाळाच्या अडचणी आहेत,हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्ष आपले अर्धवट सोडावे लागू नये म्हणून दर वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये च्या मेंढपाळावर जो हल्ला झाला बातमी मला समजतच मी शारदाताई पांढरे यांना फोन लावून विचारणा केली त्या दुसऱ्या गावी गेल्या असताना त्या मना म्हणाल्या मी आल्याबरोबर मेंढपाळाशी भेट देणार व त्या दवाखान्यांमध्ये जाऊन त्या माय माऊलीची विचारपूस केली व पोलीस तक्रार सुद्धा त्यांनी केली.
गरजू इथून पुढे सुद्धा समाजासाठी लढण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे . यासारखे अनेक उपक्रम वजीर यांनी सुरू केले आहेत. या उपक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त दरवर्षी केली जाते या जयंतीनिमित्त लोकांना असे आवाहन केले जाते की जयंती धुमधडाक्यात साजरी करा परंतु अनावश्यक खर्च टाळून एक वही समाजबांधवांसाठी या सामाजिक उपक्रमाला हातभार लावा. शैक्षणिक साहित्य देऊन आपल्या समाज बांधवांची मुले शिकवून त्यांचे हात बळकट करण्यासाठी या उपक्रमात शैक्षणिक साहित्य देऊन सहभागी व्हावे.असे आवाहन केले जाते.
एक कॉल प्रॉब्लेम साँल या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मेंढपाळ बंधू भगिनी तसेच धनगरवाड्यावरील अडचणीत असलेल्यांना मदत केली जाते आजपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक बांधवांना आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्याची मोलाची कामगिरी संघटनेमार्फत झाली आहे याचाच एक भाग म्हणून कै. रामचंद्र गडदे रा.नागोळे तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली या मेंढपाळाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला त्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत म्हणून . तसेच मेंढपाळ समाज हा भटकंती करणार असल्याने डोंगर कपारीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची शक्यता केले होते त्यास वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळू शकते घेऊन देण्यात आली.
छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यात विठ्ठल तु एकटा नाहीस हा उपक्रम राबवून वन्य प्राण्यांच्या (गव्याच्या) हल्ल्याची जखमी झालेल्या गरीब धनगर वाड्यातील विठ्ठल बाजारी यांच्या उपचारासाठी लागणार आर्थिक खर्च लोकसभागातून केला गेला त्यासाठी हजारो रुपयांची आर्थिक मदत या संघटनेच्या माध्यमातून समाज बांधवांकडून करण्यात आली.
कोरोना काळामध्ये जिल्हा बंदी असल्याने समाज बांधवांच्या आर्थिक व पोटापाण्याची हाल होऊ लागले याचाच विचार करून संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी यांचे विरोधात आवाज उठवून मेंढपाळांना जिल्हाबंदी उठविण्यात यावी यासाठी महत्त्वाची भूमिका संघटनेने बजावली तसेच लॉकडाऊन मध्ये यशवंत वैद्यकीय कक्ष सुरू करून मेंढपाळ बांधवांना तातडीचे वैद्यकीय मदत करण्यात आली. जंगलात राहणाऱ्या बांधवांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यानंतर नुकसान भरपाई मिळत नव्हती नुकसान भरपाई मिळावी यासाठी दगडोबा वजीर साहेब सतत पाठपुरावा करून सन २००४ साली निर्णय बदलण्यास शासनास भाग पाडले. वसंतराव नाईक इतर मागासवर्गीय महामंडळाच्या सर्व योजनांचा फायदा राष्ट्रीय बँका बरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेतही योजनाचा लाभ मिळावा सतत पाठपुरावा करून सदर योजनेसाठी मध्यवर्ती बँकेचा समावेश करण्यात आला.याचा फायदा धनगर समाजातील जवळजवळ शंभर तरुणांनी घेऊन प्रत्येकी दहा लाख रुपये बिनव्याजी कर्जही घेतलेले आहे. दुर्गम भागातील बांधवाचे केवळ वैद्यकीय उपचार वेळेत मिळाले नाहीत अनेकदा बांधवांचा मृत्यू होतो हे टाळण्यासाठी शासनाकडून वाडया- वस्त्यावर आरोग्यदुत नेमण्यात यावेत यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. तसेच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना वैद्यकीय व इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी अर्थिक मदत केली आहे.
दगडोबा वजीर साहेब यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आत्तापर्यंत त्यांना समाजभूषण, , , देवदूत, अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यशवंत क्रांती संघटनेच्या सामाजिक कार्याबद्दल प्रथम पारितोषिक देण्यात आले दगडोबा वजीर यांना २०२4चा बारामती येथे देण्यात आला आहे. धनगर साम्राज्य,न्यूज गंगाखेड यांच्याकडून त्यांना पत्रकार म्हणून नेमणूक करण्यात आली तालुका अध्यक्ष, सन्मानित यांनी सामाजिक कार्यातुन तरुण युवा पिढी समोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सव समितीकडून समाज भुषण पुरस्कार देऊन त्यांना बारामती येथे सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध जिल्हातून तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश आणि दिल्ली* मधून सत्कार मूर्ती आणि पत्रकार , यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व अनेक वृत्तपत्राचे संपादक , इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे विशेष प्रतिनिधी, पत्रकार, व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
Discussion about this post