बालासाहेब बापुराव जाधव हे 3 मार्च रोजी काही कामानिमित्त पालम येथे आले असता त्यांना ताडकळस येथिल अंभोरे व कळगाव येथिल तुकाराम या भेट झाली दरम्यान सदरील व्यक्ती व इतरांनी आमची शेती दाखवतो असे सांगून गाडी वर बसून पेठ शिवणी मार्ग पुर्णा येथे नेऊन मारहाण केली.
सदरील व्यक्तीला मारहाण करून त्यांच्या कडील रोख रक्कमेसह हातातील अंगठी हिसकावून घेत जख्मी अवस्थेत पुर्णा येथील रेल्वे पुलाजवळ टाकून पोबारा केला.
संबंधित व्यक्ती ही सायंकाळी घरी न आल्याने कुटुंबातील सर्व नातेवाईकांनी परिसरात चौकशी करून माहिती घेतली असता सदरील व्यक्ती कुठेही आढळुन आले नाही.
त्यामुळे हवालदिल झालेल्या कुटुंबाला गावातील व्यक्ती कडून माहिती मिळाली की बालासाहेब बापुराव जाधव हे पुर्णा येथे रेल्वे पुलाजवळ जख्मी अवस्थेत पडलेले आढळून आल्याने त्यांना पुर्णा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले,ही माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांचे बंधू व मुलगा यांनी पुर्णा येथे धाव घेऊन परीस्थितीची माहिती घेऊन पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे हलविण्यात आले.
मुकुंद बाबासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून पालम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या आदेशावरून पालम पोलिस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आर.के.मुंढे यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना तातडीने अटक करून पुढील तपास करीत असुन सदरील व्यक्तीचा दिनांक 6 रोजी रुग्णालयात निधन झाले असून सदरिल घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
Discussion about this post