निलेश सोनोने..
ग्रामीण प्रतिनिधी पातुर..
पातुर तालुक्यात बनावट दस्तावेज तयार करून शासनाची फसवणूक करत वाईन पार आणि हॉटेल साठी परवाने मिळवण्याचा प्रकार उघडीस आला आहे. या प्रकरणात पातुर न्यायालयाने पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून एक आरोपीला दोष मुक्त करण्यात आले आहे. न्यायालयाचे आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकृत दस्तावेज फेरफार करून बनावट मालकी हक्क दाखविले तयार करण्यात आले होते. आरोपी लक्ष्मण ढोणे नंदा ढोणे आणि विश्वास ढोणे यांनी संगमत करून हे कागदपत्रे तयार केली आणि शासनाकडून वाईन बार साठी परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केला. या प्रकरणात तक्रारदार मंगेश इंगळे यांनी प्रथम पातुर पोलिसाकडे आणि नंतर अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली. मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या वतीने एडवोकेट ए एस काझी यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश प्रसाद ठाकरे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत क्र 38/2021 अंतर्गत कलम 156/3/अन्वे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल :
पातुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र 67 /2025. नोंदवण्यात आला आहे या प्रकरणात कलम 406/409/420/465/468/4717/474 आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
या पाच आरोपीवर गुन्हा दाखल :
बाळासाहेब बालसिंग आडे तत्कालीन ग्रामपंचायत सचिव. खानापूर
गजानन गोवर्धन धाडसे तत्कालीन सरपंच खानापूर लक्ष्मण मोतीराम ढोणे
वय 61 वर्ष नंदा लक्ष्मण ढोणे वय 51 वर्ष विश्वनाथ लक्ष्मण ढोणे वय 31 वर्ष हे तिघेही सूर्योदय वाईन बार वाशिम रोड यांच्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एक आरोपी दोष मुक्त :
सहा नंबरचे आरोपी सुकलाल महादेव खंडारे वय 49 वर्ष राहणार खानापूर रोड पातुर यांच्या विरोधात ठोस पुरावा आढळलेला नाही त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोष मुक्त केले आहे..
Discussion about this post