शहीद मंगेश हरिदास रामटेके यांच्या शहीद दिनानिमित्त बुधवारी (ता.५) श्रद्धांजली वाहिन्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आयटीबीपीचे जवान सीटीजीडी इंद्रजित पाटील व एएसआयजीडी अनिलकुमार आणि तहसीलदार कल्याणकुमार डहाट,पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल, खंडविकास अधिकारी डॉ चेतन जाधव, पीएसआय सुरेखा बिडगर, नपंचे लेखापाल वाघचौरे, भारतीय स्टेट बँक मधील अधिकारी-कर्मचारी, माजी नगराध्यक्ष लव्ह जनबंधु, निरंजन धनविजय, अर्चना मोटघरे, निशाताई जांभुळे, वैशालीताई पेंदाम यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी मान्यवरानी पुष्पचक्र वाहुन श्रद्धांजली वाहिली.नगर पंचायतच्या वतीने शहीद मंगेश हरिदास रामटेके यांचे स्मारक बनविण्याकरिता ठरावा मध्ये काही त्रुटी आहेत.
त्या लवकर पूर्ण करून देण्यात यावे अशी विंनती जनबंधू यांनी केली.सूत्रसंचालन व आभार सुगत वाघमारे यांनी मानले
Discussion about this post