
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, (प्रशांत सोनवणे)
एकलव्य विद्या प्रसारक मंडळसंचलित श्री एम एम निऱ्हाळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संस्थेचे कलाशिक्षक ख्यातनाम चित्रकार गणेश सरोदे यांनी अहिल्यानगर भूषण पदमश्री राहिबाई पोपेरे यांचे उत्कृष्ट फलक लेखन करून संपूर्ण जिल्याचे लक्ष वेधून घेतले आहे,
त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रतापकाका ढाकणे यांनी म्हटले कि २१व्या शतकात आज प्रत्येक महिला पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या महिलां अहिल्यानगर भूषण पदमश्री राहिबाई पोपेरे या संपूर्ण महिला वा समाजासाठी आदर्श आहेत आणि चित्रकार गणेश सरोदे यांनी केलेले रेखाटण चित्र उत्कृष्ट आहेत व विद्यार्थ्यांना प्रेणादायी आहे यात राजमाता जिजाऊ, पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, डॉ.आनंदीबाई जोशी, अंतराळवीर कल्पना चावला, क्रिकेटपटू स्मृती मानधना, डॉ. किरण बेदी, समाज सुधारक मदर तेरेसा, हिरकणी, महिला पोलीस अधिकारी किरण बेदी वा स्वर्गीय बबनरावजी ढाकणे यांचे सुद्धा फलक लेखन आजवर चित्रकार गणेशजी सरोदे यांनी केले आहे स्वर्गीय बबनरावजी ढाकणे त्यांचा जीवनप्रवास सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडला. या उपक्रमासाठी पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा संस्थेच्या वतीने सन्मान व गौरव करण्यात आला.
त्यावेळी संस्थेचे कला शिक्षक गणेश सरोदे सर वा सांस्कृतिक विभाग प्रमुख बुगे सर यांनी पण आपले मत व्यक्त केले..
Discussion about this post