भैय्या जोशी यांच्या मराठी भाषे विषयीच्या वक्तव्याबाबत मलकापूर तालुका व शहराचे शिवसेना उबाठाने जोशीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन दिले.
प्रतिनिधी :- राहुल संबारे (8379856501)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्या जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विवादास्पद वक्तव्याबाबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मलकापूरच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून तहसील चौकात निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे वसंतराव भोजने, जिल्हा प्रमुख, दिपक चांभारे पाटील, तालुका प्रमुख, गजानन ठोसर, शहर प्रमुख, राजेशसिंग राजपुत, विधानसभा संघटक, राजेंद्र काजळे, शकील जमादार, गणेश सुशीर, साजिद खान, शाम जाधव, बाळू पोलाखरे, समद कुरेशी, पाडुरंग चिम, राम थोरबोले, शरेद करान, वासुदेव भोगे, चांद कुरेशी, सैय्यद वसिम, दिपक सरोदे, रफिक भाई, अकील चव्हाण, इम्रान लकी, दिपक कोथळकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
मुंबईमध्ये येणाऱ्यांनी मराठी शिकले पाहिजे असे काही नाही, इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. एवढेच काय तर मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे असे वक्तव्य करून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या भैय्या जोशी यांच्या या वक्तव्याचा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिपक चांभारे पाटील यांनी सांगितले की, ही जी काही वक्तव्य होत आहेत ती सत्ताधारी जाणूनबुजून घडवून आणत आहेत. हा खऱ्या अर्थाने मराठी भाषिकांचा अपमान आहे. मात्र सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न राज्यातील मराठी भाषिक आणि बाळासाहेबांचे हे शिवसैनिक कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत. राज्य शासनाच्या एकाधिकार शाहीचा आणि भैय्या जोशीच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज रस्त्यावर उतरून जोशीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करत आहोत. शिवाय या भैय्या जोशीसह प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आणि अबू आझमी यांनी जे वक्तव्य केले आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अबू आझमी यांची तात्पुरती नाही तर कायमस्वरूपी आमदारकी रद्द करण्यात यावी अशीही मागणी केली जात आहे.
Discussion about this post