
नांदेड / प्रतिनिधी,
भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या१९८ व्या स्मृतीदिना निमित्त सावता परिषद या सामजिक संघटनेच्या वतीने आय.टी.आय. येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रदेश प्रभारी गोरखनाथ राऊत, माजी सभापती लक्ष्मणराव जाधव, रामचंद्र रासे, सखाराम शीतळे,सोनाजी राऊत,जिल्हा उपाध्यक्ष सुनिल शिंदे, महानगर अध्यक्ष बालाजी बनसोडे,जिल्हा प्रवक्ते मारोती शीतळे, युवा महानगर अध्यक्ष संदीप झांबरे, सोशल मिडिया जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर गोरे, सुजित राऊत, रमेश लोखंडे,विष्णू चौधरी, राजू मोरे, इत्यादी समाज बांधव ज्येष्ठ नागरिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post