शिरूर तालुका प्रतिनिधी:-
मलठण (ता. शिरूर, जि. पुणे) — पै. सागर (आप्पा) दंडवते युवा मंच आणि पै. सागर (आप्पा) दंडवते किंग ११ मलठण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “पै. सागर (आप्पा) दंडवते करंडक २०२५”या भव्य फुलपीच टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. २६ मार्च २०२५ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूलसमोर, मलठण येथे ही स्पर्धा रंगणार आहे.
स्पर्धेच्या मुख्य आकर्षणांचा थोडक्यात आढावा:
बक्षिसे (अद्वितीय रक्कम व आकर्षक पुरस्कार): प्रथम क्रमांक — ₹७१,००१/- व भव्य चषक
द्वितीय क्रमांक — ₹५१,००१/- व चषक
तृतीय क्रमांक — ₹४१,००१/- व चषक
चतुर्थ क्रमांक — ₹३१,००१/- व चषक
विशेष वैयक्तिक बक्षिसे:
मालिकावीर (Man of the Series) — एल.ई.डी टी.व्ही व चषक
उत्कृष्ट फलंदाज — स्पोर्टस् सायकल व चषक
उत्कृष्ट गोलंदाज — स्पोर्टस् सायकल व चषक
स्पर्धेच्या विशेष नियमावल्या: एक गाव, एक संघ असा स्पर्धेचा मुख्य नियम. प्रत्येक संघात फक्त १ आयकॉन (शिरूर तालुक्या बाहेरील) खेळाडूला संधी. प्रथम २० संघांना प्रवेशाला प्राधान्य. सामने लिग पद्धतीने व प्रत्येक सामना ६ षटकांचा. १३ खेळाडूंना आयोजकांकडून टी-शर्ट. लॅक पँट व शुज अनिवार्य. अन्यथा ५ धावांची पेनल्टी. सर्व लिग सामने चेस बंधनकारक. संपूर्ण प्रवेश फी भरल्याशिवाय प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम. गैरवर्तन करणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाद करण्याचा अधिकार आयोजक व पंचांना.
प्रवेश फी: ₹ १२,०००/-
मैदान सौजन्य:
मा. श्री. श्रीपाददादा नेवासकर (मलठण)
स्पर्धेचे ठिकाण व दिनांक:
स्थळ: न्यू इंग्लिश स्कूल समोर, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे.
दिनांक: बुधवार, २६ मार्च २०२५ ते रविवार, ३० मार्च २०२५ संपर्क: 9764372323 / 7796832983 / 9975972616 आयोजक: पै सागर (आप्पा) दंडवते किंग ११ मलठण, ता. शिरूर, जि. पुणे.
खेळाडूंनो, स्पर्धकांनो, आणि क्रीडाप्रेमींनो…!
मलठण गावच्या इतिहासातील सर्वात भव्य आणि आकर्षक बक्षिसांची क्रिकेट स्पर्धा तुमच्या सहभागाची वाट पाहत आहे! तुमच्या संघाची नोंदणी लवकर करा आणि मैदान गाजवा..!
Discussion about this post