महापालिका क्षेत्रातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ई बस च्या चार्जिंग स्टेशन सह बस डेपो च्या उभारणी साठी मुहूर्त ठरला असून येत्या रविवारी म्हणजेच उद्या १६ मार्च रोजी सकाळी ८.३० मिनिटांनी पालकमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या डेपो चा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे.मिरजेतील तालुका क्रीडा संकुलाच्या पूर्वेस या बस डेपो साठी जागा निश्चित झाली आहे तब्ब्ल ५० बस या ठिकाणी वाहनतळावर चार्जिंग साठी उभ्या असतील. या जागेवर वाहनतळ (बस डेपो) चार्जिंग स्टेशन या बस साठी वर्क शॉप उभारणी, तसेच पार्किंग सुविधांची सोया असेल. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून आता महापालिका क्षेत्रामध्ये ई बसेस धावणार असून काही प्रमाणावर प्रदूषण संतुलनाचे कार्यही या माध्यमातून केले जाईल काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहितीही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली होती. आणि मुळातच पर्यावरण प्रेमी असलेल्या शुभम गुप्ता यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सतत पाठपुरावाही केला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ११ कोटी रु मजूर आहेत. या डेपोमधील चार्जिंग स्टेशन उभारणी आणि विद्युतीकरण साठी २.४४ कोटी रु मंजूर आहेत. हा निधी केंद्र आणि राज्य शासन संयुक्त रित्या देणार आहे. तर विद्युत पुरवठा करण्यासाठी लागणार ट्रान्सफॉर्मर आणि इतर तांत्रिक कामासाठी सुमारे ३.५३ कोटी रु मंजूर आहेत. या प्रकल्पामुळे मिरज शहरामध्ये एक विकासाभिमुख प्रकल्प येईल. तर पुणे शहरातील बस फेऱ्यांच्या धर्तीवर आता सांगली मिरज कुपवाड बस फेऱ्या सुरु होतील. या प्रकल्प कामासाठी काही दिवसांपूर्वी या जागेवरील अतिक्रमणे उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या लवाजम्यासह हटवण्यात आले होते.
Discussion about this post