जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन येथे मार्च 2024 मध्ये दाखल झालेला गुन्हा भा.द. वि. कलम. 376 , 376(N) ,107,109,506 तसेच पोक्सो कलम 4 ,6 , मोटार वाहन कायदा कलम 128(1) , 194(C) मध्ये मागील पाच महिन्यांपासून कारागृहात असणारा आरोपी ऋषिकेश भीमराव वाळुंजकर याचा जामीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा यांनी फेटाळला होता.
सत्र न्यायालयाचे आदेशा विरोधात आरोपीने ॲड. इरफान मणियार आणि ॲड. कृष्णा शिंदे यांच्यामार्फत
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रकरणातील पुराव्यांची व तथ्यांची सत्यता तपासून तसेच ॲड. इरफान मणियार आणि ॲड. कृष्णा शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी ऋषिकेश भीमराव वाळुंजकर याची जामीनावर मुक्तता केली आहे.
Discussion about this post