..आणि शाळेच्या सभागृहात चक्क गोकुळच अवतरले.*
संजय फलके, शिरूर तालुका प्रतिनिधी
आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर. येथील पूर्व प्राथमिक विभागाने अतिशय आनंदी व भक्तिमय वातावरणात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली.
लहान मुले कृष्ण व मुली राधा तसेच सर्व माता पालक देवकी तर काही यशोदा मैया च्या वेशभूषेत उपस्थित होत्या सर्व शिक्षक वृंदांनी आकर्षक अशी सजावट केली.
त्यामध्ये गाय-वासरू, नटखट कृष्ण, नाचणारे मोर, बासरी, हंडी मोरपीस अशी आकर्षक सजावट करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या सौ. अश्विनी घारू मॅडम, शिक्षक वृंद व माता पालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
त्यानंतर सर्व माता पालक तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी उत्साहत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली शाळेच्या प्राचार्या तसेच उपस्थित माता पालकांनी सौ. प्रीती सोनवणे,
सौ. सोनाली पवार, सौ सुप्रिया रासकर , सविता मुलीक, शुभांगिनी शिंगवी, कु.आसिया शेख, कु. शिल्पा गडकर, सौ. रसिका मोरे आणि कु अक्षदा अवचिते या शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.
सर्व चिमुकल्या बालगोपाळांनी दहीहंडी फोडली व प्रसादाचा आस्वाद घेतला खरंतर आमचे केवळ विद्यार्थीच नाही तर सर्व माता पालकही उत्साही व आनंदी होते. सर्वांनी मिळून कृष्ण जन्माष्टमी साठी फेर धरला अतिशय शिस्तबद्ध आणि देखणा कार्यक्रम पूर्व प्राथमिक विभागाने आनंदाने पार पाडला. प्राचार्या आश्विनी घारू यांनी कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते व भगवत गीतेचे महत्व सांगून कार्यक्रमाची सांगता केली . शालेय समितीचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, संस्थेचे सदस्य धरमचंद फुलफगर व विद्यालयाच्या प्राचार्या अश्विनी घारु यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.🙏🏻😊
Discussion about this post