परंडा प्रतिनिधी:- परंडा तालुक्यातील जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 17 वर्षे वयोगटातील मुलीचा संघ खोखो स्पर्धेत तालुक्यात प्रथम आला आहे. ग्लोबल इन्स्टिट्यूट परंडा या ठिकाणी झालेल्या 17 वर्ष वयोगट मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला असून धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा स्पर्धेसाठी परंडा तालुक्यातून निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक श्री हजारे टी एम सर यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री खुरुंगे व्ही आर संस्थेचे अध्यक्ष सचिव व सर्व सन्माननीय सदस्य, माजी मुख्याध्यापक श्री. नारायण भांडवलकर सर श्री.बबन सर, श्रीमंत दादा नुस्ते , मनोज भांडवलकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक व ग्रामस्थ यांनी विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या…..
Discussion about this post