शहापूर- सरलांबे रस्त्यावरील तुते गावाजवळील पुल वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक…
सदर पूल तात्काळ दुरुस्त करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी..
शहापूर : प्रफुल्ल शेवाळे
शहापूर तालुक्यातील शहापूर-बामणे-तुते- सरलांबे रस्त्यावरील तुते गावालगत असणारा पुल वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक झाला आहे. छोटया गाड्यांच्या वाहतुकीमुळे सुद्धा या पुलाचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.पुलाच्या अशा अवस्थेत एस.टी महामंडळाची बस पुढे जात नसल्याने विद्यार्थ्यांनां, नागरिकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे.
सदर घटने ची गंभीरता लक्षात घेता प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी बांधकाम विभागाचे उप
अभियंता यांची भेट घेऊन पुलाची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे.
सदर पुलावरुन पुढील अनेक गावांचा संपर्क होत आहे.ह्या पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत,तर सरक्षंक कठडे तुटले असुन कधीही मोठा अपघात होउ शकतो एकंदरीत पुल धोकादायक बनला असल्याने विद्यार्थी, महिला,जेष्ट नागरिक यांना पायपीट करत बस पकडण्यासाठी पुलाच्या अलीकडे यावी लागते अशी माहिती प्रहाचे युवा संघटक मयूर किरपण यांनी प्रहार कार्यालयात निदर्शनास आणून दिल्याने लगेचच प्रहार पदाधिकाऱ्यांनी शहापूर बांधकाम विभागाचे उपांभियता यांची भेट घेत एका निवेदनाद्वारे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.यावेळी अनेक प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post