.यावेळी संस्थेचे अध्यक्ष किसन दादा जाधव संस्थेचे सचिव डिके जाधव साहेब संस्थेचे संचालक शेलार साहेब मुख्याध्यापक आखाडे सर शिक्षक शिंदे सर एचडी जाधव सर बी आर पवार सर कासुर्डे मॅडम बनसोडे सर व पालक उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक एचडी जाधव सर यांनी केले.
सभेमध्ये शिक्षक पालक संघाची कार्यकारणी निवड करण्यात आली.
यामध्ये शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून गणेश संकपाळ वेळापूर यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण शेलार बुरडाणी उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे आमशी तसेच माता पालक संघ महिला अध्यक्ष म्हणून धनश्री विकास जंगम तळदेव यांची एकमताने निवड करण्यात आली .
यावेळी शिक्षक आणि आपले मते मांडली व पालकानेही आपली मते मांडली यावेळी परगावहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण पाहता एकच समस्या आहे ती म्हणजे एसटी वेळेवर न येणे यावेळी संस्थेचे अध्यक्ष किसन दादा जाधव यांनी आपण एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा आपण सगळी मंडळी करू असे आश्वासन दिले आहे.
यावेळी अनेक पालकांनी आपल्या समस्या मांडल्या रवी संकपाळ वेळापूर गणेश संकपाळ वेळापूर या सभेवेळी मंथन या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व सम्मान चिन्ह देण्यात आले .
सभेला भागातून बरेचसे पालक आले होते त्यांची अल्प उपहार व्यवस्था संस्थेने केली होती.
बी आर पवार सर यांनी आभार मानून सभेची सांगता केली.
प्रतिनिधी दिपक जाधव तळदेव महाबळेश्वर
8275929314

Discussion about this post