आर.एम.धारीवाल नागरी ले आऊटमधील सार्वजनिक रस्ते मागासवर्गीयांना वापरण्यासाठी खुले करून द्या !
रिपाइं ज्येष्ठ नेते भाई राजेश इंगळे .
मलकापूर शहरातील आर.एम.धारीवाल नागरी ले आऊटमधील सार्वजनिक रस्ते मागासवर्गीयांना वापरण्यासाठी खुले करून देण्याची मागणी रिपाइं ज्येष्ठ नेते भाई राजेश इंगळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.मुख्याधिकारी नगरपरिषद मलकापूर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,
शहरातील बुलढाणा रोडवर आर.एम.धारीवाल यांनी नागरी ले आऊट तयार करून त्यामधील प्लाट लोकांना विकले आहेत.परंतु या ले आऊटच्या मागच्या बाजूला मागावर्गीय लोकांची मोठी वस्ती असल्यामुळे व या लोकांची लेआऊटमधुन वर्दळ वाढल्यास आपले प्लाट विकले जाणार नाही या वाईट उद्देशाने धारीवाल यांनी आपल्या ले आउट मधील सार्वजनिक रस्ते भिंती उभारून बंद केले
आहेत.त्यामुळे मागासवर्गीयांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी खुप फिरून यावे लागते.नियमानुसार ले आउट मधील रस्ते व ओपन स्पेस हा सरकारच्या मालकीच्या असतो.
बेकायदेशीरपणे भिंती उभारून कोणीही ते बंद करु शकत नाही.केवळ मागासवर्गीयांनी रस्ते वापरु नये या दुष्ट हेतूने रस्ते बंद करणे हा अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे.त्यामुळे रस्ते बंद करणार्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Discussion about this post