ग्राम हिंगणा काजी येथील समस्यांबाबत वंचित चे तहसीलदारांना निवेदन….
…… मलकापूर तालुक्यातील ग्राम हिंगणा काजी येथील तंटामुक्ती अध्यक्ष निवड बाबत झालेली अनियमितता दूर करण्याबाबत आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी गावातील नागरिकांसोबत तहसीलदार श्री राहुलजी तायडे यांना वंचित तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित चे पदाधिकारी अजय सावळे, आतिश भाई खराटे ,सुशील भाऊ मोरे , गणेश भाऊ सावळे ,संजू भाऊ बावस्कार उपस्थित होते.
…….. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 28. 10. 2024 रोजी ग्राम हिंगणा काजी येथे ग्राम शाखेची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये हिंगणा काजी येथे तंटामुक्ती अध्यक्ष हे पद असावे यासाठी पहिला ठराव घेण्यात आला आणि तो बहुमताने पारित झाला. परंतु त्याचवेळी गावातील काही असामाजिक तत्त्वांनी गोंधळ घालून तंटामुक्ती अध्यक्ष पद गावाला नकोच असा दुसरा ठराव गोंधळात पारित केला. आणि या ठरावाला ग्रामसेवक बघे यांनी अनुमोदन देऊन दुसरा ठराव पारित केला. या संदर्भात आज गावातील काही सुज्ञ नागरिकांनी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन गावात तंटामुक्ती अध्यक्षपदी कायम राहावे यातील अनियमित दूर करावी यासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले.
निवेदन देतेवेळी तहसीलदार साहेबांसोबत चर्चा करताना त्यांनी सदर प्रकार तहसीलदार साहेबांना तोंडी सांगितला आणि लेखी निवेदन दिले. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन तहसीलदार साहेबांनी येत्या 4 सप्टेंबरला ग्रामसेवक, गटविकास अधिकारीआणि या संदर्भातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक त्यांच्या दालनातबोलवली आहे.
…….. सदर निवेदन देतेवेळी गावातील सागर संग्राम सिंग मोरे, राजू पांडुरंग शेगोकार ,सागर देविदास शिरसाठ ,प्रवीण शांताराम सोनवणे, अक्षय दुर्योधन कंटाळे ,संतोष प्रकाश आकोटकर आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post