छावाचे संस्थापक अध्यक्ष सुनिल भाऊ भोर व प्रदेश महासचिव सचिन भिसे यांच्या नेतृत्वाखाली छावा संघटनेत पुण्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश…
छावाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी विलास पाटील तर प्रदेश उपाध्यक्षपदी शीतल मोरे यांची निवड…
प्रतिनिधी (नाशिक) :- रविवार दि. २८ जुलै २०२४ रोजी छावा मराठा सेनेत पुणे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा व महिलांचा प्रवेश सोहळा हॉटेल कुणाल गार्डन काळेवाडी येथे संपन्न झाला.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेच्या महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीताताई नाईकरे यांनी केले. यावेळी त्या बोलताना म्हटल्या की मला एखाद्या आमदाराने जरी सांगितले की एक लाख रुपये देतो आणि आमची पाच तास वाट बघा तरी आम्ही बघणार नाही परंतु आमचे संस्थापक अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाला पाच तास लेट झाले तरी आम्ही वाट बघितली कारण आम्ही त्यांचे प्रामाणिक आणि एकनिष्ठ पदाधिकारी आहोत आणि आम्हाला सुनील भाऊ भोर यांना खूप मोठ्या उंची वरती घेऊन जायचे आहे त्यांच्यासाठी आम्ही सर्वजण मेहनत घेणार आहोत. महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आम्ही नेहमीच वाचा फोडत असतो आम्ही इथून पुढे अतिशय जोमाने संघटना वाढवण्यासाठी काम करू.
यानंतर संघटनेचे प्रदेश संघटक हेमंत झोले यांनी बोलताना सांगितले की आपले संस्थापक अध्यक्ष हे अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आहे कुठलाही पद्धतीचा डाग त्यांना लागलेला नसून अतिशय कमी वेळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनेचा विस्तार केलेला आहे आणि हजारो तरुण आज त्यांचा आदर्श घेत आहेत मी एका आमदाराचा मुलगा असताना देखील मला त्यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी अतिशय आनंद होतो आपण देखील माझ्यासारखेच त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.
प्रदेश महासचिव सचिन भाऊ भिसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आम्ही शेकडो शाखा उद्घाटन करू व सुनील भाऊ जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचे नेहमीच पालन करू शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही छावा मराठा सेना या संघटनेची साथ कधीच सोडणार नाही.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल भाऊ भोर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की छावा मराठा सेना ही छावा संघटना मराठा आरक्षण, शेतकरी , कामगार , विध्यार्थी, महिला यांसह बहुजन समाजासाठी काम करत असते. आजच्या नियोजित कार्यक्रमाला मी पाच तास लेट झालो असलो तरी आपण सर्वजण या ठिकाणी तितक्यात जोशात आणि जोमात माझी वाट बघत थांबलात कार्यक्रम यशस्वी केला हीच खरी छावाची ताकद आहे. प्रामाणिकपणा एकनिष्ठ पणा आणि जे काम आती घेतलं ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटायचे नाही असेच काम आपल्याला करायचे आहे. येणाऱ्याला सोबत घेऊन चला, न येणाऱ्याला सोडून चला, जो आडवा येईल त्याला मात्र उभा आडवा चिरून चला हे आण्णासाहेब जावळे पाटलांनी आपल्याला शिकवले आहे. मी त्यांचा रक्ताचा वारस नसलो तरी त्यांचा विचारांचा वारस मी नक्कीच आहे. याचा मला अभिमान आहे. अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज करण्यात आल्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तसेच आपल्या परिसरामध्ये गाव तिथे शाखा घर तिथे छावा हे स्वप्न घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितलं तसेच जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळ्या अडचणी आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो तो त्रास त्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो संघटनेच्या माध्यमातून आपण अनेक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहे. ज्या ज्या वेळेस राजकीय क्षेत्रातील लोक सर्वसामान्य माणसाचं काम करणार नाही काही ठराविक लोक दादागिरी करतील गुंडागिरी करतील त्यावेळेस त्यांचा बंदोबस्त्याचे करण्याचे काम आपण छावा संघटनेच्या माध्यमातून करत असतो आणि येणाऱ्या काळात देखील आपल्याला ते करायचा आहे. असे प्रतिपादन सुनिल भाऊ भोर यांनी केले. तसेच राजकीय लोकांना पैसे देऊन गाड्या घोड्या देऊन लोक बोलवावे लागतात परंतु आपल्याला कुठलेही पैसे न देता शेकडो लोकं संघटनेसाठी उभे राहतात ही संघटनेची खरी ताकद आहे. येणाऱ्या काळात आपण सर्वजण एक संघटना म्हणून नाहीतर कुटुंब म्हणून एकत्र राहू आणि संघटनेचे काम करू भविष्यात संघटना खूप मोठी करू असे प्रतिपादन सुनील भाऊ यांनी केले व येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक आंदोलने करायचे आहे आणि त्या आंदोलनासाठी तयार राहा असा सुचक इशारादेखील सुनिल भाऊ भोर यांनी दिला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल ताई मोरे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार विशाल भाऊ भऱ्हाटे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास पाटील व संगिता ताई नाईकरे यांनी मेहनत घेतले.
तसेच या कार्यक्रमासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते सुनिल भाऊ भोर, संघटनेचे प्रदेश संघटक हेमंत भाऊ झोले, संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीताताई नाईकरे, पश्चिम महाराष्ट्र सचिव विशाल भाऊ भऱ्हाटे, राहूल भाऊ धस, संघटनेचे नाशिक तालुका अध्यक्ष कैलास शिरसाट, ज्ञानेश्वर बोराडे, कामगार आघाडी पिंपरी चिंचवड अध्यक्ष वाल्मीक पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी विलास पाटील साहेब व महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पदी शितल मोरे या प्रमुख पदांसह ४०-४५ पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी या संस्थापक अध्यक्ष सुनिल भाऊ भोर यांच्या हस्ते करण्यात आल्या.
Discussion about this post