आष्टी प्रतिनिधी
दुसऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात सांगली येथील खिलार कोसा जातीचा बैल शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. हजारों शेतकरी व विद्यार्थ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आजचा विद्यार्थी हा देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे. भारत कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे.
आष्टी सारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, अत्याधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याबाबत ज्ञान मिळावे यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी डॉ. स्वामिनाथन राज्यस्तरीय दुसऱ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यासह देशाची भावी पिढी असणारे शालेय विद्यार्थी यांनी या कृषी प्रदर्शनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे. हजारो विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. कृषी प्रदर्शनांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, त्याचप्रमाणे विदर्भ या ठिकाणाहून विविध प्रकारचे स्टॉल आलेले आहेत.
उत्कृष्ट व गुणवत्ता धारक फळे , वेगवेगळे ट्रॅक्टर, दूध डेअरी संबंधी उपकरणे, यामध्ये गाईचे दुध काढणे मशीन, कृषी महाविद्यालय तयार केलेले गांडूळ खत व इतर खाण्याची पदार्थ, सांधेदुखी वरील गुणकारी औषधे, सोलर सिस्टिम, खते, बी – बियाणे, औषधे तसेच शेतीविषयक माहिती असणारे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, बॉडी मसाज करणे मशिन , वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे, आवळ्यापासून बनवलेले वेगळे पदार्थ, तसेच खवय्यांसाठी वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळे पदार्थांची कृषी प्रदर्शनात रेलचेल आहे. सांगली येथील खिलार कोसा जातीचा बैल हे शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण आहे. महेश आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे येणारे शेतकऱ्यांची मोफत तपासणी केली जात आहेत.
कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वागत कक्षामध्ये युवा नेते अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, चेअरमन राजेश धोंडे यांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. १ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते अजयदादा धोंडे यांनी केले आहे.

Discussion about this post