(वार्ताहर) प्रशांत माने जुन्नर :-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत उपवनसंरक्षक जुन्नर वनविभागासाठी ७ कामांना ग्राम परिसर व आदिवासी विकास कार्यक्रम अंतर्गत ८० लक्ष रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली. याबाबत आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, वरील जुन्नर वनविभागात सन २००१ पासुन बिबट वन्यप्राण्याचा मानवी वस्तीत सातत्याने प्रवेश होवून व्यक्ती व पाळीव पशुधन यांचेवरील हल्ल्यांच्या घटनात वाढ झाली आहे.
सदरघटनांमुळे स्थानिक लोकांच्या रोषाला सामोरे जाव लागत आहे. जुन्नर वनविभागामध्ये मानव बिबट संघर्ष जास्त प्रमाणात वाढला आहे. सन २०२४ मध्ये या वनविभागात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झालेले आहेत तसेच या घटनांमधून नागरिक मृत्युमुखी पडल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. या प्रकरणी सदर ठिकाणी जनक्षोभ उसळला असून मानवी जीवन धोक्यात आलेले आहे. स्थानिक लोकांचा उद्रेक झाला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्यांचे माणसांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून सदरचे क्षेत्र मानव बिबट संघर्षाचे संवेदनशील आपत्ती क्षेत्र झालेले आहे. सदर बाब या वनविभागात नित्याची झालेली आहे. त्या अनुषंगाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ग्राम परिसर व आदिवासी विकास कार्यक्रम अंतर्गत आवश्यक साहित्य खरेदीसाठी निधीची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेतून वनसंरक्षण कामाकरिता ३ वाहन खरेदी करण्यासाठी ३१ लक्ष ८३ हजार रुपये, १० ट्रॅप कॅमेरे खरेदी करण्यासाठी ३ लक्ष १८ हजार ६०० रुपये, सापळा पिंजरे (trap cages) १० खरेदी करण्यासाठी २७ लक्ष ५० हजार रुपये, ६ भिंत पिंजरा खरेदी करण्यासाठी ४ लक्ष ८० हजार रुपये, नायलॉन दोरी ६ नग खरेदी करण्यासाठी ४८ हजार रुपये, thermal drone खरेदी करण्यासाठी ९७ हजार ५०० रुपये आदी कामांना निधी मंजूर झाला असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
Discussion about this post