श्री क्षेत्र शेगाव येथे दशनाम गोसावी समाजाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना दशनाम गोसावी समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत गिरी महाराज यांनी दशनाम गोसावी समाजाच्या विविध प्रश्नावर मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमात उपस्थित माननीय आमदार डॉ संजय कुटे यांना आमचा समाधी भूमी व व इनाम जमिनीचा प्रश्न सरकार दरबारी मांडून गोसावी समाजाला न्याय द्यावा असे मागणी केली
त्या वेळी आमदार डॉ संजय कुटे यांनी लवकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात मंत्रालयात एक बैठक घेऊन दशनाम गोसावी समाधी बचाव समितीच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समाजाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यात येईल गोसावी समाज विकासासाठी सरकार सर्वतोपरी समाजासोबत आहे लवकरच गोसावी समाजाच्या आर्थिक महामंडळ विषयी घोषणा केली जाईल व सर्व प्रश्न सोडवले जाईल असे आश्वासन दिले आहे यावेळी महंत दसगिरी महाराज,युवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिक गिरी,
युवा प्रदेश सरचिटणीस गोपीचंद पुरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पुरी कायदेशीर सल्लागार ऍड विकास गिरी विदर्भ प्रदेशाध्यक्ष गजानन खुशाल गिरी तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते
Discussion about this post