ज्वेलर्स दुकानदाराच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून पळणारे २ चोरटे पोलिसांच्या ताब्यात
३१, दिवा (ठाणे) : दिवा शहरातील बेडेकर नगर येथील पलक ज्वेलर्स
दुकानात चैन व हिऱ्याचा हार घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी मालकावर बेशुद्धीचा स्प्रे मारून दोघेजण पळून जाण्याच्या तयारीत असताना ज्वेलर्स मालकाने वेळीच आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी दुकानात धाव घेत घुसखोरांना पकडले. त्यावेळी ताबडतोब दिवा पोलीस ठाण्याचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. २ घुसखोऱ्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू करण्यात आले आहे. सदर आरोपी पैकी मयूर जैन हा कुर्ला येथील राहणारा असून दुसरा वत्सल पटेल हा आरोपी वलसाड, गुजरात येथील राहणारा आहे. असे पोलीस तपासात समोर आले आहे.
फिर्यादी जितेंद्रसिंग सोलंकी यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे. गुन्हा क्रमांक १८३३/ २०२४ नुसार बी एन एस कायदा २०२३ नुसार कलम ३०९ (५) व ३ (५) नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून. मुंब्रा पोलीस अंतर्गत दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले तसेच सहाय्यक फौजदार सुभाष मोरे यांनी गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू ठेवला आहे.
Discussion about this post