आर.टी.ई. : गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात आरक्षण
दिवा (ठाणे) विभागात अनेक दिवसांपासून आर.टी.ई. (शाळा शिक्षणात आरक्षण योजना) विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला जात होता, ज्यामुळे अनेक पालक त्रस्त झाले होते. सरकारने गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे म्हणून आर.टी.ई.ची स्थापना केली आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना हवे त्या शाळेत प्रवेश मिळावा.
शाळांची आर्थिक अडचण
परंतु ज्या विद्यार्थ्यांचे आर.टी.ई. मार्फत शाळेत प्रवेश होतो त्यांची फी सरकारकडून येते. ती गेले चार ते पाच वर्षे शाळेला मिळाले नसल्याने शाळेने प्रवेश घेण्यास बंदी केली होती. या संदर्भात शाळाकडून हायकोर्टात रिट पिटीशन दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाच्या आदेशांची अवहेलना
परंतू न्यायालयाने हे प्रवेश बंधनकारक आहे, असे सांगून या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा असे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळेला पैसे येत नसल्यामुळे शाळेने पण विद्यार्थी न घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
एस.एम.जी. शाळेची स्थिती
दिव्यातील एस.एम.जी. स्कूल या शाळेचा शिक्षणाचा दर्जा, शाळेची ऍक्टिव्हिटी आणि शिस्तपालन ही चांगली असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा कल हा एस.एम.जी. शाळेकडे आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त विद्यार्थी आर.टी.ई.च्या माध्यमातून या शाळेत प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु शाळेच्या आर्थिक समस्येमुळे हे विद्यार्थी प्रवेश नाकारले जात आहेत.
या समस्येचा लवकरच तोडगा निघावा आणि गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित व्हावे, म्हणून पालक आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे अशी अपेक्षा आहे.
Discussion about this post