नागरिकांना विनम्र सूचनाः
दूरक्षेत्र निवघा बाजार हद्दीत येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांना नम्रतापूर्वक विनंती व सूचना आहे की, काल रात्रीपासून ते आतापर्यंत आपल्या गावात व परिसरात मुसळधार व संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे दळणवळणाचे तसेच पुराचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. विशेषतः नदीकाठाच्या किनाऱ्यालगतच्या भागात राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधा:
जर आपल्या परिसरात वरीलप्रमाणे कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्भवली असेल (उदा. पाणी चढणे, रस्ते पाण्याने बंद होणे), तर कृपया 8329976264 या संपर्क क्रमांकावर कळवावे. आपली सूचना मिळताच महसूल व पोलीस प्रशासनाकडून तातडीने मदत पुरवली जाईल. मदतीची नितांत गरज असल्यास विलंब टाळण्यासाठी कृपया त्वरित संपर्क साधावा.
आपली सुरक्षा महत्वाची:
या अतिवृष्टीमुळे आपत्ती निर्माण होण्याची उच्च शक्यता आहे. यामुळे वेळोवेळी परिस्थितीचे अचूक आकलन करूनच आपल्या सुरक्षिततेच्या निर्णय घ्या. अगदी गरजेच्या कामांशिवाय घराबाहेर पडू नका. कुटुंबाच्या जीविताच्या सुरक्षेसाठी ऋतुस्थितीचा अंदाज घ्या आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
🙏 काळजी घ्या, सुखरूप रहा! 🙏
Discussion about this post