सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक – १२.०३.२०२५
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती उपशाखा तालुका माढा गुणवंत शिक्षक पुरस्कार श्री . बाळासाहेब नारायण शिंदे शाळा रणदिवेवाडी यांना आमदार श्री अभिजीत आबा पाटील , समाज कल्याण माजी सभापती श्री शिवाजी नाना कांबळे , पंचायत समिती सभापती श्री विक्रम भैय्या शिंदे यांच्या उपस्थिती अरण येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती त्रैवार्षिक अधिवेशनात देण्यात आला .
श्री . बाळासाहेब नारायण शिंदे सर यांची सेवा ३१ वर्षे झालेली आहे . विद्यार्थी प्रिय शिक्षक , स्पर्धा परीक्षा तयारी , शालेय कामकाज उत्कृष्ट , शाळा रंगरंगोटी , डिजीटल शाळा , वनऔषधी परसबाग , वक्तृत्व स्पर्धेत जिल्हास्तरापर्यंत शाळेचा क्रमांक , MTS स्पर्धेत जिल्हयात क्रमांक या उल्लेखनीय बाबी आहेत . माननीय गटशिक्षणाधिकारी श्री विकास यादव साहेब , विस्तार अधिकारी श्री दिगंबर काळे साहेब , केंद्रप्रमुख श्री विजय काळे साहेब यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या .
श्री बाळासाहेब नारायण शिंदे हे उपळाई बु चे रहिवासी आहेत. १९९३ साली आहेरगाव या ठिकाणी सेवेची सुरूवात . उपळाई बु . दुसरी शाळा . बरेच विद्यार्थी अधिकारी . लऊळ झुंझारवस्ती ७ वर्ष सेवा विद्यार्थी मंथन , MTS स्पर्धेत जिल्हयात क्रमांक , रणदिवेवाडी शाळा रंगरंगोटी करून डिजीटल केली त्यांची एकूण सेवा ३१ वर्षे झाली आहे . हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले .
Discussion about this post