यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-रजत चांदेकर

राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येथे दिनांक 12 मार्च रोजी गोंडवाना प्राण हितेचा सुपुत्र गोंडवाना चा योद्धा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची 192 वी जयंती विहिरगांव येथे साजरी करण्यात आली.. गोंडी परंपरेने बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. गोंड समाजाच्या शुर योद्ध्याने 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांविरोधात बंड पुकारले आपल्या नेतृत्वाखालील लष्करासह त्यांनी अनेक लढाया जिंकल्या त्यांच्या कार्याची आठवण करण्यात आली. बापूराव शेडमाके अमर रहे, अमर रहे असा जयजयकार करीत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आदिवासी गोंडवाना संघटना शाखा अध्यक्ष डोमाजी कोडापे, उपाध्यक्ष अनंता टोरे,सचिव महेश परचाके, जयराम सोयाम,विठ्ठल कोडापे, कुंडलिक परचाके, नत्थू मडावी, कुंदन कोडापे, ग्रा.प.सदस्या स्मिता परचाके, गंगाबाई कोडापे, ललिता कोडापे, हर्षल कुळसंगे, ओम राठोड, प्रणय जुमनाके, पत्रकार रजत चांदेकर, अरविंद कोडापे व समस्त समाज बांधव उपस्थित होते…
Discussion about this post