मनीषा नवले
तालुका प्रतिनिधी
राहू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
अंतर्गत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांच्या ३ हजार रुपये जमा झाले. हे पैसे आले की नाही पाहण्यासाठी व ते पैसे काढण्यासाठी प्रत्येक बँकांमध्ये महिलांचा गर्दी मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केला असून या योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे ,तर महिलांमध्ये एक उत्सवाचा नजारा दिसून येत आहे, मात्र अर्ज केलेले काही महिलांचा बँक खात्याच्या केवायसी, आधार लिंक, मोबाईल नंबर लिंक न झाल्याने खात्यात लडकी बहीण योजनेच्या पैसे जमा न झाल्याने बँकांमध्ये महिलांसोबत ने-आन करणाऱ्या पुरुषांच्याही समावेश असून गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
विशेष म्हणजे राज्य सरकारकडून या योजना सुरू होऊन याची अंमलबजावणी ही विशेष वेळेवर करण्यात आली. रक्षाबंधन हा सण महिलांसाठी अनांदाहिक व महत्त्वपूर्ण सण मानल्या जातो , महिलां आपल्या माहेरी जाऊन आपल्या भावाला राखी बांधून सन साजरा केला जातो, तर हा सण महिलांसाठी विषेसस म्हणावा लागेल तर सणाच्या वेळेवरच माझी लाडकी बहीण योजनाच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले म्हणजे महिलांच्या एक प्रकारचं आर्थिक निवारण झाल्याची समजून येते व त्यातच आता बैलपोळा सण सुद्धा जवळस समोरे आला असून अहेरी तालुका परिसरातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांच्या धावपळ सुरू असून ,माझी लाडकी बहिण ‘ योजनेच्या पैसे काढण्यासाठी महिल्यांची गर्दी दिसून येत आहे.
Discussion about this post