1 Total Views , 1 views today
अतिपावसामुळे पाथरी तालुक्यातील परिस्थिती
दिनांक 1 सप्टेंबर 2024 वार रविवार रोजी पाथरी तालुक्यात झालेल्या अती पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. पाण्याची पातळी इतकी वाढली की शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे.
शेतीचे होणारे नुकसान
या पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील नद्या आणि नाले पिकांमध्ये शिरल्यामुळे वाढीलेल्या पिकांची हानी झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे पिक पूर्णपणे नष्ट झाले आहे, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांचे आर्थीक संकटाला तोंड देताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रशासनाने पंचनाम्याच्या आधारे त्वरित आर्थिक साहाय्य दिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान थोडेफार कमी होऊ शकते.
Discussion about this post