भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी आणि दि यश फाउंडेशन संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप वाटद जि. प. गट आयोजित वाटद जि. प. गटातील महिलांसाठी मंगळागौर व खेळ पैठणी स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धेतील मंगळागौर स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये १०००० व सन्मानचिन्ह , द्वितीय पारितोषिक रुपये ७००० व सन्मानचिन्ह , तृतीय पारितोषिक रुपये ५००० व सन्मानचिन्ह बक्षीस देण्यात येईल.
तसेच पैठणी स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये २५०० ची आकर्षक पैठणी आणि प्रथम ४ विजेत्यांना रुपये १००० ची आकर्षक पैठणी आणि सर्व सहभागी महिलांना साड्या देण्यात येतील.
ही स्पर्धा फक्त वाटद जि. प. गटातील महिलांसाठी मर्यादित असुन या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा.
सौ. आर्या गडदे
९५८८६९५४५२
सौ. प्रिया वेळणकर
९७३०२०६९२२
कु.अपर्णा गुरव
८६००५२८७५९
श्री. पांडुरंग पाचकुडे
७९७२४८३८९७
स्पर्धेची वेळ व ठिकाण –
बुधवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ३.०० ते ८. ०० वा.
स्थळ – सर्वसाक्षी हॉल, खंडाळा
Discussion about this post