रांजणगाव गणपती वार्ताहर.अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या रांजणगाव गणपती मंदिरात मुक्त द्वार दर्शन बुधवार दिनांक ४सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत भाद्रपद गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले
असून४सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महागणपती च्या मूर्तीस स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे .केवळ द्वार यात्रेच्या काळात थेट गाभाऱ्यात दर्शन होत असते यामुळे भाविकांची अलोट गर्दी रांजणगाव गणपती येथे होत असते ४सप्टेंबर रोजी पूर्व द्वार श्रींची पालखी कर्डे येथील मांजराईदेवी( दोनलाई) कडे जाते त्यादिवशी पालखीचा मान पाचुंदकर आळी यांच्याकडे असतो.
.५सप्टेंबर दक्षिणद्वारा करता श्रींची पालखी निमगाव म्हाळुंगीआसराई देवी( शिरसाई ) कडे जाते६सप्टेंबर रोजी पश्चिमद्वार असून श्रींची पालखी गणेगाव येथील ओझराई देवी कडे जाणार असून शनिवारी ७सप्टेंबर रोजी श्रींची पालखी उत्तरद्वार मुक्ताई देवी कडे जाणार आहे .
दक्षिणद्वारा माळ आळी पश्चिम द्वारा करता लांडे आळीआणि उत्तर द्वारा करता शेळके आळीकडे पालखीचा मान असतो ७ तारखेसअवधूत चक्रांकित महाराज आळंदीकर यांचे कीर्तन रविवार दिनांक ८सप्टेंबर मुक्त द्वार दर्शन पहाटे सहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत असणार आहे .
सकाळी दहा ते अकरा या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक होणार असून दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे सोमवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी श्रींच्या पुढे भाविकांची दंडवते होतील दुपारी मोरेश्वर बुवा जोशी यांचे काल्याचे किर्तन होणार असून मंगळवार दिनांक १० रोजी मानकरी यांना बिदागी वाटप करण्यात येणार आहे.
Discussion about this post