आदिवासी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र सुलभरित्या देण्यात यावे या मागणीसाठी दि१३/८/२०२४पासुन कोळी समाजाच्यावतीने तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू असुन दि.३०/८/२४रोजी कोळी समाजाचे ५०/६० लोकांनी अचानक रस्त्यावर ठिय्या मांडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यामुळे पोलीसांनी रास्तारोको आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते.मलकापुर शहर अतिसंवेदनशील असल्यामुळे लहान सहान कारणांवरून शहरात हिंदू मुस्लिम दंगली घडुन आल्याचा ईतिहास असल्याने कोळी समाजाच्या रास्तारोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी होऊन हिंदू मुस्लिम भागात तनाव निर्माण झाला होता.
दि.२/९/२४ रोजी पोळा सण असुन कोळी समाजाच्या आंदोलकांकडुन अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमाव बंदीचा प्रस्ताव ठाणेदार मलकापूर शहर पोलिस ठाणे यांचेकडून प्राप्त झाल्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी संतोष शिंदे यांनी तहसिल चौकापासून जि.प.उर्दु शाळेपर्यंत दि २/९/२४ पासुन कोळी समाजाचे आंदोलन संपेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केले आहेत.
Discussion about this post