– ता. प्रीतिनिधी -लोणार तालुक्याला लागूनच अवघ्या 10 किलोमीटर वर मेहकर तालुका आहे. आणि मेहकर तालुक्यातील डोणगाव हे गाव नागपूर ते मुंबई हायवे वर बसलेले असून तेथील लोकसंख्या जवळपास 20 हजाराच्या आसपास येते.
आज डोणगाव येथे सुद्धा शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा केला आहे.
आणि तो मात्र अनोख्या पद्धतीने बैल पोळ्यामध्ये बैलाच्या मस्तकावर शेतकऱ्यांनी चक्क पोस्टर लावले की मालकाच्या सोयाबीनला ६००० रुपये भाव मिळू दे.म्हणजेच शेतकऱ्यांच्या सोयाबीन मालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बैल पोळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पोस्टर लावून बैलपोळा साजरा केला.

Discussion about this post