अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते – प्रा.भुयारे..
केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिग, स्टाफ सेलेक्शन कमिशन, केंद्रीय सांख्यिकीय संघटन, राष्ट्रीय नमुना पाहणी संघटन, इत्यादी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अर्थशास्त्र हा विषय अतिशय महत्वाचा असून तो सर्वाधिक गुण मिळवून देणारा आहे.
नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमात स्पर्धा परीक्षेतील अर्थशास्त्र हा स्वतंत्र पेपर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने ठेवला असून त्याचा फायदा निश्चितच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना होईल.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिकवणी वर्ग संपल्यानंतर अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास स्पर्धा परीक्षेत सहज यश संपादन करता येते असे प्रतिपादन उद्घाटन पर भाषणात बोलतांना राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथील अर्थशास्त्र विभागाध्यक्ष प्रा.सदाशिव भुयारे यांनी केले आहे.
ते अर्धापूर येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे शंकरराव चव्हाण महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित अर्थशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन आणि आर्थिक विषयांवर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रकांच्या अनावरण प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.जे.सी. पठाण हे होते तर व्यासपीठावर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. रघुनाथ शेटे, संयोजक डॉ.विशाल बेलुरे ,डॉ.कदम के.के.यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जे. सी. पठाण यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, संयम आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणत्याही परीक्षेत यश मिळवणे सोपे आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विशाल बेलुरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. के. के. कदम यांनी केले तर अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष ऋषिकेश कदम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या अभ्यास मंडळ उद्घाटन कार्यक्रमास वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ. निळकंठ लांडे, सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शिंदे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा.प्रशांत कदम यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. साक्षी गणेशराव जाधव, कु. मनीषा पंडितराव दुधाटे, कु. वैष्णवी वसंतराव सिनगारे, कु. कोमल अर्जुनराव झुडपे, किशन शिवानंद कदम, कु.पल्लवी मल्हारी जगताप, कु. पूजा तुकाराम पारवे, कु. अर्चना प्रकाश दुधाटे, कु. ऋतुजा गोविंदराव माटे, कु. अनुजा अर्जुन गोरे, कु. शिफा मरयम खान, कु. दिव्या आनंदराव नवले, कु. पूनम पंडितराव कोटुळे इत्यादींनी परिश्रम घेतले.
Discussion about this post