शंकरराव ढगे 9890964982
अर्धापूर,प्रतिनिधी
तालुक्यातील निमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ कांबळे यांची अखिल भारतीय मातंग संघाच्या हदगाव तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ दत्तराव कांबळे
यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मातंग संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भारत खडसे यांनी निमगाव येथे घेण्यात आलेल्या साहित्य रत्न आण्णाभाऊ
साठे जयंती कार्यक्रमात साईनाथ कांबळे यांची अखिल भारतीय मातंग संघाच्या हदगाव तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, यावेळी, प्रा.गुणवंत काळे,साळुंके,आदी उपस्थित होते,
त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Discussion about this post