लोहा (प्रतिनिधी) पठाण सोहेल
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थातच एस टी बस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल दि. (०३) रोजी मंगळवार पासून बेमुदत संप पुकारला असल्याने अचानक एसटीची चाके जागीच रूतल्यामुळे लोहा बसस्थानकात संपामुळे प्रवाशी अडकून पडल्यामुळे प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या एसटीचे खाजगीकारण
करण्यात येवू नये, महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक यासह इतर विविध प्रलंबित मागण्या आचासंहितेपूर्वी मान्य कराव्या यासाठी राज्य महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संयुक्त संघटनेच्या वतीने दि. ३ सप्टेंबर मंगळवार पासून बेमुदत बंद पुकारला असल्याने एसटी ची चाके जागेवर थांबल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
प्रवाशांना संपाची नेमकी तारीख माहित नसल्याने प्रवाशी बसस्थानकावर येवून अडकल्याची परिस्थिती दिसून येत आहे.
Discussion about this post