“शासनाला एक निवेदन”
उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या 31 तारखेपासून 3 तारखेपर्यंत पावसाने हाहा कार माजवला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उध्वस्त झाला आहे. नदीकाठचं नाल्याकाठच हातचा आलेले सोयाबीन, कापूस , ज्वारी व इतर अन्य पिके नष्ट झाली आहेत. राज्याचे सत्ताधारी नेते विधानसभेच्या निवडन तिकीट वाटपामध्ये गुंग झाले आहेत. आता सोयाबीन कापूस व इतर पिकाला हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे.
परत विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात की काय अशी शंका येत आहे. 72 तास अगोदर त्यांना नुकसान झाल्याचे कळवावे असा नियम आहे असे म्हणतात. परंतु शेतकऱ्यांचा कुठलाही फोन ते हेल्पलाइनच्या माध्यमातून उचलत नाहीत. शेतकऱ्यांनी फोन केला तर रिस्पॉन्स देत नाहीत. विशेषता जंगल भागातील दुर्गम भागातील लोकांचे मोबाईल दोन दोन दिवसापासून चार्ज नाहीत. अनेकांना फोन करायचं माहीत नाही. आणि फोन करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. कारण सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
अनेक गोरगरिबांची व शेतकऱ्यांची घर पडलीत पावसामुळे जमीन खरडून गेली. घरपडीचे आणि जमीन खर्डाचे पैसे सुद्धा तात्काळ शासनाने द्यावे.
Discussion about this post