

परभणी.. प्रतिनिधी….
ओमप्रकाश शर्मा..
9156438966
गंगाखेड शहरातील रस्ते बंद करण्यापर्यंत अतिक्रमण धारकाची मजल गेली भगवती चौकाकडे जाणारा रस्ता अतिक्रमामुळे बंद होण्याच्या मार्गावर असून ठीक ठिकाणच्या सर्विस रोडवर देखील दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढत असल्याने या रस्त्याचा श्वास कोंडला आहे.शहरात अतिक्रमणाचे अनेक प्रकार आहेत,सरकारी नगर परिषद हक्काच्या जागावर वर्षानुवर्षापासून अतिक्रमणे स्त्रावली आहेत ज्या जागा पासून उत्पन्न मिळू शकते अशा मोक्याच्या जागाही अति अतिक्रमण धारकाच्या नजरेतून सुटल्या नाहीत त्यामुळे सरकारी कार्यालय असो की नगर नगरपरिषद यांना त्यापासून छदामही मिळत नाही.उलट पक्षी अतिक्रमण काढण्याची वेळ आली तर त्यासाठी नगरपरिषद मनुष्यबळ यंत्रसामग्रीचा खर्च देखील सोसावा लागतो.अतिक्रमण धारकाचे मात्र सोय केली जाते कुठलाही गुन्हा दाखल न करता दंड न लावता त्याला अतिक्रमण काढण्याची नोंदणी केली जाते.काढण्यासाठी वेळ दिला जात असल्याचे चित्र नेहमी दिसून येते.त्यामुळे आज अतिक्रमण काढले तरी पुन्हा ते थाटण्याची आवश्यकते साहित्य अतिक्रमणाकडे सुस्थितीत असते.चार दोन दिवस गेले अधिकारी नेते मंडळीच्या भेटीगाठी घेतले की पुन्हा त्या जागेवरती आवर्तत असल्याचे अनेक वेळा दिसून ठोस कारवाई अभावी अतिक्रमण धारकांना कोणाची भीती जरा वाटत नाही उलट पक्षी अनेक जण अधिकाऱ्यांना अरेरावी करत असल्याचे चित्र आहे..
Discussion about this post