
राज्य सरकारने कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणाऱ्या भंडारदरा धरणाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या धरणाला आता आद्यक्रांतीकारक वीर राघोची भांगरे जलायश असे नाव देण्यात आले आहे. यासंबंधीचा एक शासनादेशही तत्काळ जारी करण्यात आला आहे
नगर जिल्ह्यातील अकोले तालुका आपल्या धरणांसह क्रांतीकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे यांनी ब्रिटीशांविरोधात मोठा लढा उभा केला होता
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भंडारदरा धरण आहे. या धरणावर जलविद्युत केंद्रही आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने येथे वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. येथील छोटे – मोठे धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध व थंड हवा येथील मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. विशेष म्हणजे भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.
भंडारदरा धरणाच्या नामकरणाबाबत शासनाला अनेक अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सदर जलाशयाचे “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्यात आले आहे, असे यासंबंधीच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आह
नगर जिल्ह्यातील अकोले तालुका आपल्या धरणांसह क्रांतीकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे यांनी ब्रिटीशांविरोधात मोठा लढा उभा केला होता.
Discussion about this post