ज्ञानाचा प्रकाश देण्या
दिवा अखंड जळतो
जीवनाचा खरा अर्थ
शिक्षकांमुळेच कळतो.
असे शिक्षकांचे समाजजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.असे मत अंगणवाडी शिक्षिका सौ.सारीका दळवी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संग्रामनगर (माळीनगर) शाळेत विद्यार्थी व पालक यांच्या वतीने शिक्षकांचा ५सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.रेश्मा तांबोळी होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक विनोद थोरात यांनी केले.
यावेळी बोलताना अंगणवाडी शिक्षिका सौ.सारीका दळवी म्हणाल्या की,
गुरू माझा
ज्ञानाचा सागर
दिला त्यांनी
माझ्या जीवना आकार
या उक्तीप्रमाणे शिक्षक हा ज्ञानाचा सागर आहे.तो विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देतो.समाज सुसंस्कृत करण्यासाठी शिक्षक वृंदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.या मुळेच शिक्षकांना समजात महत्वाचे स्थान आहे.
यावेळी मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी यांचे भाषण झाले.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ पुजा लोखंडे, संगिता ऐवळे, आनंदी बनसोडे,पिंटू जाधव,साधू जाधव,शरद ऐवळे आस्मा शेख आदि पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Discussion about this post