( महादेव कुंभार याज कडून.)
शिरदवाड – दि. 5/9 ( वार्ताहर )
शिरदवाड ग्रामस्थ व विविध पक्ष संघटना यांच्या मोर्चा, आंदोलनाला अखेर यश दोन्ही ग्रामपंचायतीनी विभागून निधी वापरून सांडपाण्याचा निचरा करण्याचे दिले आदेश..!
सहा वर्ष हून अधिक काळ शिवनाकवाडी ग्रामपंचायतीचे सांडपाणी शिरदवाड हद्दीतील गट क्र 81 मधील खाणीत सोडले जात होते. ते जवळच असलेल्या नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात शिरत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. तर काहींच्या घराणा धोका निर्माण झाला होता. शिवाय येथील नागरिकांना खूप मोठा उपद्रव होत होता. त्यांना रोगराई व साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे गेली सहा वर्षे हून अधिक काळ येथील स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या कडून आंदोलन छेडले गेली होती. काही पक्ष संघटनेच्या वतीने उपोषण व आंदोलनही केले गेले होते.
दूषित व दुर्गंधी युक्त पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. रोगराई मोठ्या प्रमाणत पसरत होती. या बाबत शिरदवाड ग्रामपंचायतीच्या वतीने ने ही जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला होता.
या सर्वाची दखल प्रशासनाने घेतली. प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती शिरोळ चे गट विकास अधिकारी मा. नारायण घोलप साहेब यांनी येथील रत्नाप्पणा कुंभार सभागृह मध्ये दोन्ही गावाच्या प्रमुख पदाधिकारी व आंदोलक कार्यकर्ते यांची संयुक्त बैठकी घेवून या प्रश्नावर सन्माननीय तोडगा काढला या मध्ये दोन्ही गावच्या सरपंच उसरपंच व सदस्य यांनी ग्रामपंचायतींना येणाऱ्या 15 वा वित्त आयोग मधील निधीमधून दोन्ही गावांनी 50-.50% सम प्रमाणात निधि वापरून आर सी सी गटार बांधकाम करणे व माळी वस्ती मार्गे गावाच्या कडेने जाणाऱ्या वड्याला सोडण्याचे नियोजन झाले. व या कामास लवकरच सुरुवात करण्याचे आश्वासन गट विकास अधिकारी यांनी दिले. त्या मुळे प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले.
या महत्त्वाच्या कामा मध्ये गट विकास अधिकारी मा. नारायण घोलप साहेब यांनी या दोन्ही गावाच्या प्रमुख पदाधिकारी यांची संयुक्त बैठकी घडवून आणली व दोन्ही गावचे समंध बिघडू नये यासाठी योग्य समन्वय साधला. या साठी गट विकास अधिकारी यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.
Discussion about this post